Tuesday, 27 May 2014


' मेहनत कर गया ‘मुर्गा’ और ‘अंडा’ मिला ‘साधुको '



तर महाराजा ऐक ........ एक विशिष्ठ अस गाव होत. त्या गावात खूप वस्त्या होत्या पण त्यातल्या त्यात विशिष्ठ पद्धतीच्या अशा 'दोनच' वस्त्या होत्या एक म्हणजे 'हात’काम करणाऱ्यांची वस्ती आणि दुसरी म्हणजे विशिष्ठ 'फुलांचा' व्यापार करणाऱ्यांची वस्ती. अशा ह्या विशिष्ठ गावाचं आकर्षण म्हणजे गेल्या ६० / ६५ वर्षापासून या गावात ‘सोन्याचं’ ‘अंड’ देणारी एक विशिष्ठ 'कोंबडी’ राहात होती तर महाराजा काय आहे या दोन वस्त्यात नेहमीच 'कोंबडी वरून खुन्नस / टशन चालायची एकमेकाचे अच्छे बुरे दिन अजीबात बगवत नसायचे पण तरीसुद्धा ‘हात’काम करणार्यांसाठी बर्याचचदा लय अच्छे दिन असायचे तर या उलट विशिष्ठ 'फुलांचा' व्यापार करणारे बहुधा लयच ‘दीन’ असायचे त्यामुळे विशिष्ठ 'फुलांचा' व्यापार करणाऱ्यांनी वैतागून एक दोनदा अच्छे दिन आणण्यासाठी 'री-कन्स्ट्रक्शन' करण्याचा अर्थात ‘नव-बांधकाम’ करण्याचा नवा धंदा करून असंख्य ‘जीवांची’ ‘चंगळ’ करत भरपूर प्रसिद्धी मिळवली पण पुढे पुढे लोकांनी ह्या धंद्याला प्रतिसाद कमी दिल्याने त्यांचा हा धंदा जरा थंडच पडला.

तर महाराजा वर सांगितल्याप्रमाणे गेल्या ६० / ६५ वर्षापासून या गावात ‘सोन्याचं’ ‘अंड’ देणारी एक विशिष्ठ 'कोंबडी’ राहात होती हे ह्या गावाचे दुर्मिळ वैशिष्ठ तर विशिष्ठ 'कोंबडी’चं काय व्हायचं की दर पाच वर्षांनी ती बिचारी विशिष्ठ 'कोंबडी' नागिणीसारखी कात टाकायची अन तरुण व्हायची मग त्या कोंबडीच पुन्हा नवं लगीन लागायचं. मग ती विशिष्ठ 'कोंबडी' सोन्याची अंडी देण्यासाठी नव्या प्रामाणिक गड्याचा ‘बेसब्रीने’ इंतजार करायची पण दुर्दैव असायचं तिचं की जुनेच नवरे पुन्हा तिचे नव्याने नवरे कम दलाल व्हायचे पण तरीही ही विशिष्ठ 'कोंबडी' लयदा 'हात’काम करणाऱ्यांचाच ‘हात’ धरायची हे विशिष्ठ 'फुलांचा' व्यापार करणाऱ्यांच्या साहजिकच ‘दिलाला’ लागायचे.

तर महाराजा आजपर्यंत या ‘हात’काम करणारयापैकी 'हाताच्या’ बोटावर मोजता येतील इतक्या जणानीच ‘इमाने’ ‘ऐत्बारे’ या विशिष्ठ ‘कोंबडी’ची सेवा केलेली आणि बऱ्याच जणानी आळीपाळीने तिचे लचके तोडले आणि तिचा फायदा उचलत सदैव आयीश केली. तर महाराजा ह्या ‘हात’काम करणाऱ्याची ही असली ‘आयीश’ बघून विशिष्ठ 'फुलांचा’ व्यापार करणाऱ्यांच्या पोटात नेहमीच गोळा यायचा . मग ह्या विशिष्ठ 'कोंबडी'चा ताबा मिळवण्यासाठी नेमके काय करावे त्यांना सुचत नसायचे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा 'री-कन्स्ट्रक्शन' उर्फ ‘नव-बांधकाम’ धंद्याच्या एक दोन पुड्या पुन्हा सोडून अंदाज घेतला पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही तेंव्हा आता नेमके काय करावे त्यांना सुचत नसायचे “, त्यांचा होता एकचं ध्यास , हातकाम करणाऱ्यांचा ऱ्हास ” पण त्यांना ‘हात’काम करणाऱ्यांचा ऱ्हास करण्यासाठी सोलिड उपाय सापडत नव्हता. 

तर महाराजा अशा ह्या कठीण समयी नेहमीप्रमाणे त्यांचे खास ‘वैचारिक पाठीराखे’ त्यांच्या मदतीला धाऊन आले आणि त्यांनी हात’काम करणाऱ्यांचा ऱ्हास करण्यासाठी एका मस्त ‘साधु’चे नाव सुचवले ‘साधू’चे जीवन म्हणजे त्यागाचा ‘कळस’ त्यांच्या खास सूत्रांच्या माहिती वरून असे चित्र उभे राही की ‘साधू’ने सगळ्या ‘मोहां’चा त्याग केलेला आहे म्हणून तो ‘त्याग शिरोमणी’ आहे त्या साधुच चरित्र / कर्तुत्व / कर्म खासकरून ‘बहुसंख्य’ लोकाना प्रेरणा द्यायचे ‘साधु’चं मुख्य वैशिष्ठ अस की तो संधीच सोने करण्यात ‘माहिर’ होता म्हणून त्याला सगळे ‘संधीसाधु’ अर्थात ‘सं.साधु’ पण म्हनायचे पण एका ‘शेर’ प्रमाणे हर तकदीर के पिछे छिपा होता है एक ‘गुनाह’ तसचं काहीतरी त्या साधुच्या पण पाठीशी होत म्हणून विशिष्ठ 'फुलांचा व्यापार करणाऱ्यांनी ठरवलं की त्या साधूला 'मिडास' राजा सारखं प्रेझेंट करायचं साधू हात लावलं ते ते सोने झालंय आणि पुढेही होईल , महागाईतही सोने खरेदी करून ठेवलेल्या मध्यमवर्गीयाना ह्या नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटले व काही विशिष्ठ मनं मोहरूनही आली पण तरीही ‘सं.साधु’के जादू का जलवा चालणार का नाही याबद्धल त्यांच्यातच संभ्रम निर्माण होताच . मग सक्सेस तक पहुँचन्यासाठी ‘सं.साधु’ मुरलेल्या नटाप्रमाणे विशिष्ठ स्वरात जोरा जोरात भाषणे देवू लागला ‘सं.साधु’ ने आधी नाटकात पण काम केलेलं त्यामुळे तो आपल्या भाषणादरम्यान टीकास्त्र सोडून नवरसापैकी वीररस आणि हास्यरसाची भरमसाठ निर्मिती करायचा.‘हातकाम करणार्‍यांवर विशिष्ठ स्वरात ‘चोर’ ‘लुटारू’ ‘दरोडेखोर’ सारख्या अर्थाचे तत्सम शब्दबाण चालवू लागला मग ‘हात’काम करणारेही’ ‘साधु’ला ‘खुनी’ ‘दरिंदा’ म्हणून संबोधायचे त्यामुळे ‘साधु’चा टी.आर.पी. खालीवर खालीवर व्हायचा.

तर महाराजा हे अस सगळं गुण्या गोइन्दाने चालू असतानाच कोणास ठाऊक कसा पण तमाम 'कावळ्यात' पांढरा शुभ्र 'बगळा' दिसावा किंवा भयाण काळ्या ‘तिमिराला’ कापण्यासाठी प्रखर तेजस्वी ‘सूर्य’ उगवावा तसा एक तरुण, तडफदार, उत्साही , दुर्मिळ 'कोंबडा' उगवला जो दिवस उजाडला कि उघड उघड ‘हात’काम करनारयांच्या विरोधात खुलेआम आरवायचा ‘हात’काम करनारयांनी आजपर्यंत आपल्या कोंबडीची किती ‘अंडी’ कशी लाटली हे ‘पु-रावा’ दाखवत सांगायचा मग त्यानंतर कोंबडीचे महत्व सांगायचा , कोंबडीच्या अंड्यावर ‘आम लोकांचाच कसा खरा अधिकार आहे हे बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून पटवायचा आणि म्हतवाच म्हणजे अप्रत्यक्ष पणे मात्र ‘कोंबडीचा’ खरा ‘दिलवाला’ मीच आहे हेही बिम्बवायचा.

तर महाराजा अश्या ह्या दुर्मिळ कोंबड्याला विशिष्ठ 'फुलांचा' व्यापार करणाऱ्यांनी टायमिंग साधून ‘हेरले’ आणि ‘ ‘फायनान्सरांच्या’ माध्यमातून हात’काम करणाऱ्यांच्या विरोधात ‘मिडियात’ प्री-प्लान ‘पेरले’ कोंबडा जरा जास्तच प्रसिद्ध व्हायला लागला त्याला रोज टि.व्ही.वर झळकायची चटक लागली. मग मिडियावाले त्याच्या बातम्यांचा रतीब घालू लागले कोंबडा म्हणजे डूबनेवावालोके लिये तिनकेका ‘सहारा’च झाला, तो रस्त्यावर उतरून कोंबडेगिरी करू लागला फिर ‘हात’काम’ करनेवालोन्की नौका गर्दिशमे डुगडुग करने लगी, कोंबड्याची मेहनत बघून आम लोकांचे डोळे अक्षरशा ‘पाण’वले त्यांना आपला ‘हिरो’ सापडला , गावातल्या पारावर, टपरीवर , हाटेलात , रिक्षात , इस्टयांडवर सगळीकड एकच चर्चा ती म्हणजे प्रामाणिक जिगरबाज कोंबडयाची.

तर महाराजा भारावलेल्या ‘आम’ लोकांनी गिफ्ट म्हणून शेवटी कोंबडीचे 'हार्टचं' त्याच्या पुढ्यात आणले पण त्याला खाता येईना मग ‘हात’काम करणाऱ्यांनी दुष्मनी विसरून काट्यानेच काटा काढण्यासाठी स्वतःहून आपल्या 'हाता’नेच कोंबडीचे 'हार्ट' कोंबड्याच्या तोंडापर्यंत सर्व केले कोंबडा खुश झाला पण त्याचवेळी ते ‘हार्ट’ 'फुलांचा' व्यापार करनार्‍यांच्या लब तक आते आते होटोसे साहिल सुटावा तसे निसटल्याने त्यांच्या फार जीवाला लागले त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल की काय अशी भीती त्यांना वाटू लागली , ते बोल्ले हमारी बिल्ली हमीको म्याउं ?

तर महाराजा समोर ताटात साक्षात कोंबडीचे 'हार्ट' असताना कोंबडा बावचळला त्याची सटकली, बोले तो , वो आख्खी ‘कोंबडी’चं मांगने लगा मनातल्या मनात ‘साधूचा’ डायलॉग अपडेट करून ‘अब्कीबार आख्खी कोंबडीच पाहिजे यार’ बोलने लगा, ‘हातकाम’ करनारे आणि 'फुलांचा' व्यापार करनारे दोघेही भाऊ भाऊ एकच आहेत असं नावीन्यपूर्ण काहीतरी बोलु लागला मग त्याला गुदगुल्या करणारी भलतीच स्वप्ने दिसू लागली हे त्याच्या ‘आम’ चाहत्यांना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ठ दिसू लागले.

तर मग महाराजा पुन्हा एकदा टायमिंग साधून 'फुलांचा' व्यापारकरणाऱ्यांनी कोंबड्याला घेरले आणि 'हातकाम' करणाऱ्यांचा आणि शत्रूंचा एजंट म्हणून पुन्हा एकदा मीडियात प्री-प्लान पेरले पर्यायी कोंबड्याचा T.R.P. लयच घसरायला लागला मग काय त्याच्या असंख्य आम चाहत्यांचा भ्रम निरास होऊ लागला कोंबडा इथचं फसला हातातले हार्ट लाथाडून साधूचा बदला घेण्यासाठी दुसऱ्याच गावात घुसला आणि स्वताहुनच त्या गावाच्या पिंजऱ्यात अडकला आणि इकडे मात्र साधुने आक्खा गाव पिंजून काढला अशा रीतीने कोंबड्याचा शेखचिल्ली कधी झाला / केला हे त्यालाचं कळले नाही. या अतीशाण्या 'कोंबडयाचा' बैल रिकामा होऊन 'तेलही' गेले 'तूपही' गेले आणि हाती राहिले 'धोपटणे' अशी अवस्था झाली , पर अब पछ्ताके का होत है जब हंस चूक गया दाना और कव्वा मोती खाया आंय ... हातकाम करनार्‍यानी तर आपल्या कर्मानेचं आपली कबर खांधली आणि साधूने मुरलेल्या नटा प्रमाणे विशिष्ठ स्वरात धुमधडाक्यात भाषणे ठोकून मुबलक प्रमाणात वीररस आणि हास्यरस निर्मिती केली , ‘गर्दी‘ रसिकांनी त्याच्या ‘कलेला’ भरभरून दाद दिली. आणि काही ‘दर्दी’ गरिब रसिकांनी तनानी , तर काही मध्यमवर्गीय रसिकांनी मनानी आणि काही श्रीमंत रसिकांनी ‘धनानी’ सं.साधूचे प्रमोशन केले, कोंबड्याची मेहनत ‘मात्र जेल’ गेली आयमिन ‘फेल’ गेली.

तर महाराजा अश्या पद्धतीने मेहनत कर गया ‘मुर्गा’ उर्फ कोंबडा और ‘अंडा’ मिला ‘साधू’ उर्फ जादुगर उर्फ ‘मिडास’ को . कोंबडीला हवा तसा नवा गडी मिळाला तरीपण कोंबडीमात्र एकदम शांत होती साधुकड एकटक पहात बोलत होती. 
‘सख्या साधू मी काल कुणा औरची होते तर आज तुझी आहे’ 
माझ्यासहित गावाच रक्षण करण्याची जिम्मेदारी आता तुझी आहे 
गाव म्हणजे नकाशा नव्हे, डोंगर नव्हे, दऱ्या नव्हे, गाव म्हणजे माणस 
गाव म्हणजे ‘वाड्या’ ‘वस्त्या’ गाव म्हणजे ‘मोहल्ले’
मोडून टाक आता सरहद्दी बरोबर माणसांचे माणसां वरचेचं हल्ले 
दिलबरा मी काल कुणा औरची होते तर आज तुझी आहे’
म्हणून रक्षण या साऱ्यांच करण्याची जिम्मेदारी आता तुझी आहे
कोंबडीच्या या विनंतिणे साधुचा गळा दाटला 
कधी नव्हे तो ‘साधू’ आता वेगळाच वाटला ........ 
मोठ्या कुटुंबाच्या ओझ्याने डोळ्यात भिजल्या सारखा वाटला.

- प्रा. अल्ताफ मुलाणी,
    27-05-2014.

Tuesday, 22 April 2014


तो इन्सान का धर्म क्या है ?

क्या धर्मसेभी पहले कभी अस्तिव में आया था इंसान
तो इन्सान का धर्म क्या है ?
अगर ‘भगवे’ का ‘भगवा’ होना , ‘हरे’ का ‘हरा’ होना
और ‘नीले’ का ‘नीला’ होना ये उनका धर्म है
तो फीर इन्सान क्या होना उसका धर्म है ?
खैर मै नहीं खेलता हूँ होली
क्युंकी चुनिन्दा लोगोने लिए हैं चुनिन्दा रंगों के ठेके आजकल
जो नचाते हैं हमें कटपुतली की तरह
क्युंकी वो जानते हैं अछी तरह के हम नाचने में माहिर हैं
और इतिहास भी गवाह है इन्ही लोगोने खेली हैं 

ऐसेही कई सारी ‘लाल’ रंग की होलीयां
इसलिए मै नहीं खेलता हूँ होली
और हाँ मै तब तक नहीं खेलूँगा होली
जब तक हम सब नहीं लेंगे ठेका “सफ़ेद” रंग
या तब तक की जब तक हम नहीं सोचते
क्या धर्मसेभी पहले कभी अस्तिव में आया था इंसान
तो इन्सान का धर्म क्या है ?


-अल्ताफ मुलाणी
   16-3-14

Wednesday, 5 March 2014


‘गिरगिटों’का मौसम

गिरगिटों’का मौसम फीर एक बार सजने लगा
देशभक्ती,समाजचिंता का ढोल फीर बजने लगा. 


कल तक तो खूब निभाई दिलोजानसे दुश्मनी यारों
अब जंग से पहले ही वो दुश्मन ‘हमराही’ बनने लगा 

‘गेम’ पूरा प्लान है आगे मिल बांटकर खाने का
'लोकतंत्र' का ये आजकल कैसा  'फलसफा' बनने लगा ?

साँस लेते हैं जिस हवा में 'अमर' 'अकबर' और 'एंथनी'
उसी  हवा में आज 'फैसिज़म' का ‘जहर’ भी है घुलने लगा. 

'वक्त' बड़ा सक्त है संभलो और संभालो दोस्तों
इन रंगों की लढाईको देख कोई 'बेघर बच्चा' है रोने लगा.

-अल्ताफ मुलाणी
  09630838340

Saturday, 23 March 2013


“साहब

“साहब” की दुवासे चलता है सबकुछ
  साहब को कहो साहब तो मिलता है सुबकुछ

  इक्कीसवी सदीमें जनता है भूखी
  पर साहब के महलोंमे जगमग है सब कुछ

 अगर चाहिये कूछ  तो समझो साहब को सब कूछ
 जब हम बन गये “हरिश्चंद्र” अब तो खोना है सब कूछ
                               -अल्ताफ’ २३/०३/२०१३

Thursday, 21 March 2013

पुन्हा सांजवेळी.



पुन्हा सांजवेळी तुझी याद आली....

राखेतील निखाऱ्याना जणू जाग आली.

वेदनांचा सोहळा होतोय जणू साजरा.... 


आठवतोय सखे तुझा शुभ्र फुलांचा गजरा.



विषप्याला पिण आहे खूप सोपं


तुझ्याविना जगणं जणू एक शाप....



युगासारखा भासतो आज प्रत्येक क्षण....


तुझ्या विना 'अल्ताफ' हा जणू एक जीर्णपर्ण.


"अल्ताफ " २१/०३/२०१३.

Friday, 15 March 2013

"सांग सखे कोण आहेस तू 
"वसंताचा बहार आहेस तू ...
का कळ्यांची कोमलता आहेस तु...
का फुलांची फुलराणी आहेस तु...
का...मृगाची कस्तुरी आहेस तू ...
सांग सखे कोण आहेस तू ...
का कोण्या एका शिल्पकाराच्या स्वप्नातलं शिल्प आहेस तु...?

सुप्रभातेच्या धूप -फुलांचा सुगंध आहेस तू ..
शिंपल्यातला मोती आहेस तू ...


का सांज समयीच्या आरतीचा स्वर आहेस तू...
का मैफिलीतल्या वाध्यांचा नाद आहेस तू
का कुण्या एका कवीची कल्पना आहेस तू ...
सांग सखे कोण आहेस तू ...
का कोण्या एका शिल्पकाराच्या स्वप्नातलं शिल्प आहेस तु...?

का सागराची नितळता आहेस तू ...
का रवीकिरणांच दिव्य तेज आहेस तू ...
का मातीतला तृप्तीचा गंध आहेस तू...
का कुण्या एका कवीची कल्पना आहेस तू ...
का कोण्या एका शिल्पकाराच्या स्वप्नातलं शिल्प आहेस तु...?
" अल्ताफ " १५/०३/२०१३            


Monday, 17 December 2012

"सजन घ्या मिठीत मला तुम्ही"
सजन घ्या मिठीत मला तुम्ही 
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!
मी नाजुक तनु देखणी
उभी एकली इष्काच्या रणी
मदमस्त हि माझी जवानी
वितळुन जाईल मेणावाणी...

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!


जन्म जन्माची मी साथींनी
तुम्ही चंद्र मी चांदणी
तुम्ही बरसात मी धरणी
या नाजुक कंठातूनी
किती गाऊ विरहाची गाणी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!

मी नार मृगनयनी
जणू फुलांची फुलराणी
जरी मी हिऱ्याची हिरकणी
तुम्हा पाहता प्रथम लोचणी
गेले मन माझं हरवूनी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं  पाहणारं नाही कुणी !! धृ !!

नका जाऊ मज असं डावलुनी
तमच्या बाहूत मला घेवूनी
मोहरून टाका स्पर्शातुनी
वादळं उठू द्या श्वासातुनी
मिटू द्या अलगद हि पापणी
सैर करुद्या चंद्रावरुनी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!
         - अल्ताफ मुलाणी