Monday, 17 December 2012

"सजन घ्या मिठीत मला तुम्ही"
सजन घ्या मिठीत मला तुम्ही 
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!
मी नाजुक तनु देखणी
उभी एकली इष्काच्या रणी
मदमस्त हि माझी जवानी
वितळुन जाईल मेणावाणी...

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!


जन्म जन्माची मी साथींनी
तुम्ही चंद्र मी चांदणी
तुम्ही बरसात मी धरणी
या नाजुक कंठातूनी
किती गाऊ विरहाची गाणी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!

मी नार मृगनयनी
जणू फुलांची फुलराणी
जरी मी हिऱ्याची हिरकणी
तुम्हा पाहता प्रथम लोचणी
गेले मन माझं हरवूनी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं  पाहणारं नाही कुणी !! धृ !!

नका जाऊ मज असं डावलुनी
तमच्या बाहूत मला घेवूनी
मोहरून टाका स्पर्शातुनी
वादळं उठू द्या श्वासातुनी
मिटू द्या अलगद हि पापणी
सैर करुद्या चंद्रावरुनी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!
         - अल्ताफ मुलाणी 

  

No comments:

Post a Comment