Monday, 17 December 2012

"सजन घ्या मिठीत मला तुम्ही"
सजन घ्या मिठीत मला तुम्ही 
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!
मी नाजुक तनु देखणी
उभी एकली इष्काच्या रणी
मदमस्त हि माझी जवानी
वितळुन जाईल मेणावाणी...

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!


जन्म जन्माची मी साथींनी
तुम्ही चंद्र मी चांदणी
तुम्ही बरसात मी धरणी
या नाजुक कंठातूनी
किती गाऊ विरहाची गाणी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!

मी नार मृगनयनी
जणू फुलांची फुलराणी
जरी मी हिऱ्याची हिरकणी
तुम्हा पाहता प्रथम लोचणी
गेले मन माझं हरवूनी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं  पाहणारं नाही कुणी !! धृ !!

नका जाऊ मज असं डावलुनी
तमच्या बाहूत मला घेवूनी
मोहरून टाका स्पर्शातुनी
वादळं उठू द्या श्वासातुनी
मिटू द्या अलगद हि पापणी
सैर करुद्या चंद्रावरुनी

सजन घ्या मिठीत मला तुम्ही
इथं पाहणारं नाही कुणी !! धृ !!
         - अल्ताफ मुलाणी 

  

Friday, 30 November 2012

"तु"



"तु"

स्त्री,बाई, औरत आणि वुमन असं तुझं कोणतंही संबोधन असो
पण आज तू जागी हो 
काळ कधीच गोठणार नाही म्हणून तू यथार्थवादी हो
आणि तूच घडव तुझं अजोड व्यक्तीमत्व
वास्तवतेत उमटू दे तुझ्या बलशाली अस्तित्वाचं प्रतिबिंब
 ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात दरवळू दे तुझ्या ममतेचा गंध 
आणि दणाणून टाक आसमंत सारा तुझ्या प्रांजळ वाणीने 
पटवून दे जगाला तुझ्या निस्वार्थी ,त्यागी, सहनशील सद्गुणांच्या खाणींची ओळख....
स्वतंत्र आहेस तू , हवं ते सारं कर पण संस्कारांना उराशी बाळगुन तुच टिकव तुझं संस्कारमुर्तीपण 
जीवनाच्या रंगमंचावर अनेक भूमिका सक्षमपणे कर 
त्यात मुलगी , ताई ,पत्नी आणि आईचं नातं निभवताना मात्र समाजाला जागं ठेवण्यासाठी नंदादिपासारखी अखंड ठेवत रहा ....
शक्य आहे तुला सार काही.....
-अल्ताफ मुलाणी

               

Saturday, 30 June 2012

"सपन"


"सपन"

येत होता रानामधुनी ऐकू कधी पाखरांचा किलबिलाट
कुठ झाडं पिकं डोलायाची, बोलायची नागमोडी पाऊलवाट !!

कुठ वाऱ्याच्या मंद तालावर मंद नाचायची झाडं मोठाली

कुठ वाऱ्याच्या झुळकीसरशी झुलायच्या नाजुक कवळ्या वेली !!

बांधातून वाहणार पाणी ऐकवी मंजुळ गाणी
तर कुठ यायची ऐकू राघुची सुमधुर वाणी !!

मनमुक्त फिरायची भिरभीर करायची रंगीबेरंगी पाखरं
कुठ शेळ्या, मेंढर ,आणि गुरं  घेवून बसत होता गुरराखी एक
अंगात बंडी, कमरेला धोतर, हातात काठी असा साधाच त्याचा पोषाख !!

होत कधी गाव माझ असं गोड "सपन"
"सपना" मधी रमायचो आम्ही सारेच क्षणोक्षण

पण आता.... झाडं गेली ,पिकं गेली , रुसली किलबिलणारी पाखरं
कारण वाढूच लागलं आता सीमेंटचं  जंगलं..सीमेंटचं  जंगल !!!
        -अल्ताफ मुलाणी