"सपन"
येत होता रानामधुनी ऐकू कधी पाखरांचा किलबिलाट
कुठ झाडं पिकं डोलायाची, बोलायची नागमोडी पाऊलवाट !!
कुठ वाऱ्याच्या मंद तालावर मंद नाचायची झाडं मोठाली
कुठ वाऱ्याच्या झुळकीसरशी झुलायच्या नाजुक कवळ्या वेली !!
बांधातून वाहणार पाणी ऐकवी मंजुळ गाणी
तर कुठ यायची ऐकू राघुची सुमधुर वाणी !!
मनमुक्त फिरायची भिरभीर करायची रंगीबेरंगी पाखरं
कुठ शेळ्या, मेंढर ,आणि गुरं घेवून बसत होता गुरराखी एक
अंगात बंडी, कमरेला धोतर, हातात काठी असा साधाच त्याचा पोषाख !!
होत कधी गाव माझ असं गोड "सपन"
"सपना" मधी रमायचो आम्ही सारेच क्षणोक्षण
पण आता.... झाडं गेली ,पिकं गेली , रुसली किलबिलणारी पाखरं
कारण वाढूच लागलं आता सीमेंटचं जंगलं..सीमेंटचं जंगल !!!
-अल्ताफ मुलाणी

This comment has been removed by the author.
ReplyDelete