Thursday, 18 June 2015

                            ‘पाऊस’


आभास हा तुझा’ 'प्रिये' मज वाटे खराखरासा !

कोरडा हा कंठ अन डोळ्यात ‘पाऊस’ तुझा जराजरासा !!

मिटत्या पापण्यात माझ्या एक स्वप्न कैद आहे,

संपलो न मी बाकी हृदयात ‘पाऊस’तुझा जराजरासा !!

‘तृष्णावलेला’ मी केंव्हांचा अडकलोय या मध्य सागरात,

थेंब टपोरे दोन प्रेमाचे घेवून यावा ‘पाऊस’ तुझा जराजरासा !!

लाडीकपणे तूच म्हणाली होतीस ना‘समुद्र’मजला ?

ह्या 'वडवानलास'ही विझविण्या बरसावा‘पाऊस’तुझा जराजरासा !!

भेगाळलेल्या कोरड्या धरतीवर चातकास
म ‘अल्ताफ’,
नकोय मुसळधार मज हवाय पाऊस ‘तुझा’ जरा-जरासा !!

    -- प्रा. अल्ताफ मुलाणी / 09630838340.

Saturday, 28 February 2015

'माणसांनो'

सतर्क राहा माणसांनो आतां सैतान मोकाट सुटले आहेत
माणसातल्या ‘माणसांचा’चा अंत करण्यास उठले आहेत
ओळखीचेच परंतु 'पाषाणमनाचे' आहेत ते सारे
नका शोधू पत्ता त्यांचा ते नेमके कुठले आहेत?
चेहऱ्यावर आहे त्यांच्या 'सुसंस्कृत' असण्याचा सोज्वळ भाव
पण लक्षात ठेवा आतून मात्र ते पक्के 'गोठले' आहेत.
चारी दिशांना किती बांधाल समता अन बंधूभावाच्या 'भणंग' भिंती?
आता कट्टरतेचे सारेच समुद्र बेभान फुटले आहेत.
दिन दहाडे चढवले जातेय खऱ्या 'संन्याशांना' सुळावर?
बहुधा न्यायसदन आता दरोडेखोरांनी' गजबजले आहेत.
घ्यावी आपुल्या ‘माणसांची’ रक्षा आपल्याच हाती ‘अल्ताफ’
जीथे 'कुंपणाचेच' हात सारे 'रक्ताने' 'बरबटले' आहेत.
😔 .../\.......‘अल्ताफ’ / 09630838340.