Sunday, 20 July 2014

  

जगातले सगळेच धर्म आणि धर्मगांडुळे करावीत एकत्र 
आणि लावावी त्यांना आग 
किंवा टाकावा त्यांच्यावर एखादा बॉम्ब 
नंतर सगळ्याच माणसांची मेमरी फॉर्मेट करून 
सगळ्यांची पूर्ण नावे देखील करावीत डिलीट एकाच कमांडने 

कारण त्यावरून ओळखला जातो त्यांचा धर्म 
आणि द्यावेत माणसांना मोबाईल सारखे नंबर , 
प्रत्येक माणूस ओळखला जाइल एका सिक्वल नंबरने 
मग आपोआपच होईल कि डेड शेक्सपिअर चे 'नावात काय आहे ' हे कोटेशन, 
ना रहेगा बांस न बजेगी बांसुरी !
यामुळे कळत राहील माणसाला किती मेलीत माणसे त्याच्या आधी
आणि तो कितवा असेल मरणारा.
मग तर होईल का जग शांत निवांत ?
का भांडतील माणसे पुढे नम्ब्रावरून ?
मला शंकाच आहे
कारण अजूनही कुणालाच सुचत नाहिये कविता माणसाची 'वृत्ती' बदलनारी !
वृत्ती कळतंय ना वृत्ती ?
              ......./\.... 'अल्ताफ'.

                            9630838340

Tuesday, 15 July 2014

‘साहब’ ‘साहब’ के आशिर्वाद से चलता है सबकुछ…… ‘साहब’ को झुककर दे सलाम उसे मिलता है 'सबकुछ'
संगेमरमर के उनके महलोंका कोना कोना है रोशन हमारी कुटिया में गरीबी को छोड़ बाकी जलता है 'सबकुछ'
खाली पेटवाले ही आशासे निभाते हैं जमुरियत में फ़र्ज़ अपना पर ये लोकतंत्र तो, साला ‘साहबों’को ही खिलाता है 'सबकुछ'
क्यूँ युधिष्ठिर की जबान पर भी पड़े ताले आजकल, दोस्त ? सुना था हरिश्चंद्र नाम का राजा सत्य के लिए खोता है 'सबकुछ'
ये ज़िन्दगी क्या पूछती हो के क्यों परेशान हो ‘अल्ताफ’? कैसे बताऊँ तुझे आजकल तो मुझे खलता है 'सबकुछ'
...... ^....... ‘अल्ताफ’ / 09630838340  /  २३-०३-२०१३  


Tuesday, 1 July 2014


'रोलर येतोय मागे मागे'


त्या उंच उंच 'फायीव स्टार' किंवा पॉश वसाहती कडे जाणाऱ्यानिळसर काळ्या चकाकणाऱ्या 'सडके'च्या कडेला मोठ्मोठाल्या ब्यानर्स ने झाकोळत चाललेली माझी एक छोटीसी 'झोपडी' कशीबशी ऊन ,वाऱ्या ,पावसात तग धरून उभी होती. पण काही 'शील' नसलेले 'प्रगतीशील' सो कॉल्ड लोक म्हणाले -कि केवळ 'अन्न धान्य' पिकवणार्या ह्या जमिनीचा कायापालट तर बघा ?क्रांती क्रांती बोलतात ती हीच की हो !पण हि 'झोपडी' मात्र या परिसराची शोभा घालवतेय.
हिला हिच्या 'बिरादरी'च्या 'एरियात' पाठवा.
मला पण तसचं वाटलं,
च्याआयला खरचं कि काय अधिकार आपल्या 'झोपडी'ला इथं जगण्याचा ?
'हे विश्वची माझे घर' ही संताची मोलाची शिकवण आठवली.
म्हंटल आपणचं बदलावा.आपला मुक्काम
पण आज सकाळी बातमी वाचली कि
रात्रीच्या मुसळधार पावसात
समोरच्याच एका अलिशान इमारतीच्या आडोश्याला उभं राहिलेल्या
पाच मुसाफिरांचा त्या 'इमारती'ने कोसळून जीव घेतला.
का पण कुणास ठाऊक मला मात्र राहून राहून माझ्या 'झोपडी'चा हेवा वाटला.
तरीही हेवा आवरत तिला म्हणालो चल जाऊयात का गं तुझ्या बिरादरीच्या 'एरियात'
ती हळवं हसत म्हणाली , जाशील कुठं ?
'फायीव स्टार' इमारतींचा रोलर येतोय मागे मागे.

-------- अल्ताफ मुलाणी.