Tuesday, 1 July 2014


'रोलर येतोय मागे मागे'


त्या उंच उंच 'फायीव स्टार' किंवा पॉश वसाहती कडे जाणाऱ्यानिळसर काळ्या चकाकणाऱ्या 'सडके'च्या कडेला मोठ्मोठाल्या ब्यानर्स ने झाकोळत चाललेली माझी एक छोटीसी 'झोपडी' कशीबशी ऊन ,वाऱ्या ,पावसात तग धरून उभी होती. पण काही 'शील' नसलेले 'प्रगतीशील' सो कॉल्ड लोक म्हणाले -कि केवळ 'अन्न धान्य' पिकवणार्या ह्या जमिनीचा कायापालट तर बघा ?क्रांती क्रांती बोलतात ती हीच की हो !पण हि 'झोपडी' मात्र या परिसराची शोभा घालवतेय.
हिला हिच्या 'बिरादरी'च्या 'एरियात' पाठवा.
मला पण तसचं वाटलं,
च्याआयला खरचं कि काय अधिकार आपल्या 'झोपडी'ला इथं जगण्याचा ?
'हे विश्वची माझे घर' ही संताची मोलाची शिकवण आठवली.
म्हंटल आपणचं बदलावा.आपला मुक्काम
पण आज सकाळी बातमी वाचली कि
रात्रीच्या मुसळधार पावसात
समोरच्याच एका अलिशान इमारतीच्या आडोश्याला उभं राहिलेल्या
पाच मुसाफिरांचा त्या 'इमारती'ने कोसळून जीव घेतला.
का पण कुणास ठाऊक मला मात्र राहून राहून माझ्या 'झोपडी'चा हेवा वाटला.
तरीही हेवा आवरत तिला म्हणालो चल जाऊयात का गं तुझ्या बिरादरीच्या 'एरियात'
ती हळवं हसत म्हणाली , जाशील कुठं ?
'फायीव स्टार' इमारतींचा रोलर येतोय मागे मागे.

-------- अल्ताफ मुलाणी.

No comments:

Post a Comment