Friday, 15 March 2013

"सांग सखे कोण आहेस तू 
"वसंताचा बहार आहेस तू ...
का कळ्यांची कोमलता आहेस तु...
का फुलांची फुलराणी आहेस तु...
का...मृगाची कस्तुरी आहेस तू ...
सांग सखे कोण आहेस तू ...
का कोण्या एका शिल्पकाराच्या स्वप्नातलं शिल्प आहेस तु...?

सुप्रभातेच्या धूप -फुलांचा सुगंध आहेस तू ..
शिंपल्यातला मोती आहेस तू ...


का सांज समयीच्या आरतीचा स्वर आहेस तू...
का मैफिलीतल्या वाध्यांचा नाद आहेस तू
का कुण्या एका कवीची कल्पना आहेस तू ...
सांग सखे कोण आहेस तू ...
का कोण्या एका शिल्पकाराच्या स्वप्नातलं शिल्प आहेस तु...?

का सागराची नितळता आहेस तू ...
का रवीकिरणांच दिव्य तेज आहेस तू ...
का मातीतला तृप्तीचा गंध आहेस तू...
का कुण्या एका कवीची कल्पना आहेस तू ...
का कोण्या एका शिल्पकाराच्या स्वप्नातलं शिल्प आहेस तु...?
" अल्ताफ " १५/०३/२०१३            


No comments:

Post a Comment