Thursday, 21 March 2013

पुन्हा सांजवेळी.



पुन्हा सांजवेळी तुझी याद आली....

राखेतील निखाऱ्याना जणू जाग आली.

वेदनांचा सोहळा होतोय जणू साजरा.... 


आठवतोय सखे तुझा शुभ्र फुलांचा गजरा.



विषप्याला पिण आहे खूप सोपं


तुझ्याविना जगणं जणू एक शाप....



युगासारखा भासतो आज प्रत्येक क्षण....


तुझ्या विना 'अल्ताफ' हा जणू एक जीर्णपर्ण.


"अल्ताफ " २१/०३/२०१३.

No comments:

Post a Comment